शिरूर । वार्ताहर
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून संचारबंदी असतांनाही दि.13 एप्रिल रोजी ट्रक आणि टेम्पोमधून मुंबई ते पाथर्डी व कल्याण ते पाथर्डी मार्गे घाटशिळ पारगाव येथे येणार्या 16 जणांविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी शिरूरचे तलाठी नामदेव पाखरे यांनी तक्रार नोंदवली. संपूर्ण राज्यात संचारबंदी तसेच जमावबंदी लागु असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इतरांच्या जिवीतास धोका होवू शकतो. याची जाणीव असतानाही या लोकांनी हयगयीचे व घातकीपणाचे कृत्य करून जिल्ह्यात प्रवेश करण्याबाबतचा परवाना नसताना तसेच जिल्हा व स्थानीक प्रशासनाला माहिती न देता ट्रक क्र.एम.एच.05 ए.एम.8511, ट्रक क्र्र.एम.एच.05 ए.एम.9785 व टेम्पो क्र. एम.एच.23-7214 या तीन वाहनातून चालकाच्या सहकार्याने घाटशिळ पारगावमध्ये प्रवेश केला. म्हणून चालकांसह 16 जणांविरूध्द शिरूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a comment