बीड । वार्ताहर
संचारबंदीतही गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी पकडला. 29 लाखांच्या गुटख्यासह टेम्पो असा 50 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी पहाटे एक वाजता मांजरसुंब्याजवळ करण्यात आली.
मांजरसुंबामार्गे टेम्पोतून (क्र.केए-32 डी-4494) गुटखा येत असल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी सापळा लावला. टेम्पोच्या मागील बाजूला दोन लाख 75 हजार किंमतीचे तांदळाचे 172 कट्टे होते. मात्र, तांदळाच्या आडून 29 लाख 40 हजार किंमतीच्या गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. मुद्देमालासह टेम्पो बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला. यासोबतच बीड ग्रामीण हद्दीत दोन व पेठ बीड हद्दीत एका ठिकाणी छापा टाकून अवैध दारुही जप्त केली. गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, सहायक निरीक्षक आनंद कांगुणे, बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक संतोष जोंधळे, गोविंद एकीलगावे व कर्मचार्यांनी या कारवाया केल्या.
Leave a comment