गेवराई । वार्ताहर
सध्या कोरोना साथ रोग पसरण्याचा संभव असताना व लोकांच्या जिवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असताना बँकेत जमणार्या गर्दीत सोशल सामाजिक अंतर रहावे यासाठी उपाययोजना न केल्याने गेवराईत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक जगन्नाथ सोनमाळी यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे असे सर्व बँकेना कळविण्यात आले आहे. बुधवारी गेवराई येथील जुन्या बसस्टँण्ड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जवळपास 50 पेक्षा जास्त खातेदारांनी बँकेत आणि बँकेच्या समोर गर्दी केली होती. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले गेले नाही.दरम्यान बँकेच्या समोर पांढरे पट्टे किंवा खुणाही केलेल्या आढळून आल्या नाहीत. योग्य ती उपाययोजना न केल्याने ही गर्दी झाली. याला जबाबदार धरुन बँकेचे शाखा व्यवस्थापक बँकेचे मँनेजर जगन्नाथ सोनमाळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान ही कारवाई पीएसआय मनिषा जोगदंड, पोलीस नाईक नारायण खटाणे, सुनील ऐटवार, संतोष गाडे यांनी केली.
Leave a comment