बीड । वार्ताहर
शहरातील भुयारी गटार योजना आणि अमृत अटल योजना ही दोन कामे तात्काळ सुरु करावीत जेणेकरून पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे गरजेचे असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आयुक्तांशी बोलताना सांगितले तेव्हा अत्यावश्यक सेवेत ही कामे घेऊन ती तात्काळ चालू करु असे सकारात्मक आश्वासन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहे.
बीड शहरात भुयारी गटार योजना आणि अमृतफळे योजनेचे काम सुरू असून मध्यंतराच्या काळात ही कामे थांबवण्यात आली आहे येत्या दोन महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे या कामामुळे बीड करांसाठी पुन्हा अडचणी निर्माण होतील आणि हे काम होण्यासाठी विलंब लागेल त्यामुळे पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे सुरू करण्यात यावे सध्या लॉक डाऊन चालू असल्यामुळे रस्त्याची कामे होण्यासाठी ही वेळ उपयुक्त ठरेल शहरातील अनेक भागांमध्ये अमृत अटलची पाईपलाईन आणि भुयारी गटार ची कामे होणे बाकी आहे,ही कामे जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून होत असून सध्या अत्यावश्यक सेवा म्हणून ही कामे सुरू झाली तर पावसाळ्यापूर्वीच होतील आणि नागरिकांना अडचण येणार नाही त्यामुळे ही दोन्ही कामे होणे गरजेची असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी बोलताना सांगितले तेव्हा ही कामे प्राधान्याने सकारात्मक विचार करून तात्काळ सुरू करू असे आश्वासन केंद्रेकर यांनी दिले आहे.
Leave a comment