गेवराई । वार्ताहर
संचारबंदी काळात ’घरात बसा, बाहेर थांबू नका’, असे आवाहन करणार्या पोलीस कर्मचार्यास आसूड उगारुन धमकावल्याचा प्रकार सोनवाडी तांडा येथे मंगळवारी (दि.14) घडली. यावरुन दोघांवर गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
भारत रामभाऊ व्हरकटे (32) असे त्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. ते गेवराई ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. गेवराई पोलीस मंगळवारी ठाणे हद्दीत संचारबंदी, जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी करत होते. सकाही साडेदहा वाजता सोनवाडी तांडा येथे गस्त घालत होते. यावेळी घराबाहेर उभे असलेल्या दोघांना व्हरकटे यांनी ’घरात थांबा, बाहेर फिरु नका’ असे सांगितले. त्यावर ते आसूड घेऊन अंगावर धावून गेले. त्यानंतर शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. भारत व्हरकटे यांच्या फिर्यादीवरुन राजू काशिनाथ राठोड, काशिनाथ लिंबा राठोड यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शासकीय कामकाजात अडथळा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन यानुसार फिर्याद नोंद आहे.
Leave a comment