आष्टी (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.काल आष्टीतील इयत्ता सहावीच्या शिवराज अमृत आजबे या विद्यार्थ्यांने आई- वडील आणि नातेवाईकांकडून जमलेल्या खाऊच्या पैशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5500 रुपयाचे मदत दिली होती.तुम्ही जर एखादे काम चांगले उद्देश मनात ठेवून करत असाल तर त्या कामाबद्दल तुम्हाला देखील लोकांची साथ मिळते.याच प्रमाणे दैनिक प्रजापत्रमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी वाचून व शिवराजच्या कार्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांनी शिवराजला सायकल भेट देऊन समाज कार्यात नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मदतीला जाणारे व शिवराजचे सायकलचे स्वप्न पूर्ण करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.यावेळी तहसीलदार निलिमा थेऊरकर,अव्वल कारकून भगीरथ धारक,शिवसेना तालुकाप्रमुख जालिंदर वांढरे,पत्रकार उत्तम बोडखे, प्रविण पोकळे,रामशेठ मधुरकर, अतुल हराळ ,शिवाजी गोरे,अमृत आजबे आदी उपस्थित होते.
Leave a comment