आष्टी । वार्ताहर
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच यंञना सध्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत.अशातच प्रत्येकवेळी वेगळ्या शैलीत दिसणारे आ,सुरेश धस सध्या कोरोनाच्या या महामारीत प्रशासकीय यंञने बरोबर स्वतः देखील सतर्क राहत असल्याचे चिञ आहे गेल्या दोन दिवसांपासून शहरात प्रवेश करणार्या नागरिकांवर जंतूनाशक फवारणीचा एक आष्टी पटर्न आमलात आणला असून यामध्ये आ.धस यांनीच हातात फवारणीचा पाईप घेत नागरिकांवर तो फवारत आहेत.
शहरातील महात्मा फुले चौक आणि आनंदऋषीजी चौक हे दोनच रस्ते फक्त शहरात दाखल होणार्या प्रत्येकासाठी खुले केलेले आहेत. इतर सर्व रस्ते बंद करुन या दोन रस्त्यांच्या मार्गावर गाडी धुण्याचा प्रेशर पाईप,मशीन,पाण्याची टाकी,त्यामध्ये जंतूनाशक औषध आणि एक माणूस अशी यंञना उभी करत शहरात प्रवेश केल्यानंतर या मार्गाचा उपयोग करणार्या प्रत्येक नागरिकांवर ही जंतूनाशक फवारणी करुन मगच त्या व्यक्तीला शहरात सोडले जात आहे.यामुळे आलेला माणूस हा फवारणी यंञाच्या समोरुनच प्रवेश करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास याची खुप मोठी मदत होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अत्यंत साधी आणि सोपी पद्धत प्रमुख शहरातील सरपंच अथवा नगरपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका यांनी अवलंबविली तर कोरोनाचा प्रसार रोखण्यास ती काही प्रमाणात यशस्वी ठरु शकते असे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.त्यामुळे आष्टीचा हा पटर्न एक चर्चेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा बचाव करणारा ठरत असल्याने तो सर्वांनीच राबवावा असे सर्वसामान्यांचे म्हणने आहे.
Leave a comment