माजलगाव । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व भाजीपाला बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी थेट कृषि विभागातील आत्मा यंत्रणे अन्तर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या मार्फत शहरांमध्ये फळे व भाजीपाला विक्रीसाठी आदेशीत केल्यानुसार माजलगाव शहरामध्ये प्रभाग निहाय फळे व भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी गटांना संनियंत्रण समितीची बैठक घेऊन दर निश्चित करुन परवाने देण्यात आले.
त्या अनुषंगाने आज थेट फळे व भाजीपाला विक्री संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार श डॉ प्रतिभा गोरे यांच्या हस्ते काल दि 15 रोजी तहसिल कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला. या वेळी त्यांनी शासनाचे सर्व नियम शेतकार्यांनी पाळायला पाहिजेत अश्या सूचना ही डॉ गोरे यानी दिल्या यावेळी तालुका कृषी अधिकारी एस.एस.संगेकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जि.एस.पवार, राधाकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष मुकुंद शिंदे, गट प्रमुख विष्णू गुजर, हनुमान होके व शेतकरी उपस्थित होते.

ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Comments (1)
Distribution system is nice
Leave a comment