नेकनूर । वार्ताहर
लॉकडाऊन मुळे ठाणे येथे स्वतः अडकून असताना मंगळवारी वाढदिवसाच्या निमित्ताने तेथूनच राक्षसभूवन येथे बाहेरून रोजंदारी कामासाठी आलेल्या अडचणीतील 90 लोकांना मदत पुरवत मित्रांच्या साह्याने वाढदिवस साजरा करणारा युवक आहे नेकनुर जवळील गाव पाणीदार करीत पाणी फाउंडेशनचे बक्षीस मिळवणार्‍या मांडवखेल गावचा भरत सुदामती सुंदरराव कदम.
दायित्वाची इच्छा असेल तर मार्ग सापडतो हेच सेवाश्रमाचं बाळकडू घेतलेल्या भरत या युवकाने वाढदिवसाच्या निमित्ताने दाखवून दिले. ठाणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला हा युवक मांडव खेल ता.बीड येथील ऊसतोड मजुरांचा मुलगा. सामाजिक कामात स्वतःला वाहून घेत गावाला पाणीदार करण्यासाठी एकत्र करीत पाणी फाऊंडेशनचे वीस लाखाचे बक्षीस मिळवण्यात मोठा वाटा असलेला भरत वडिलांच्या नावाबरोबरच आईच्या नावाला स्थान देत वेध भविष्याचा या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करीत असलेल्या या युवकाला राक्षसभुवन परिसरात बाहेर जिल्ह्यातून मजुरीसाठी असणार्‍या नव्वद लोकांना तेथेच सोडत ठेकेदार पैसे न देता पळून गेल्याने उपासमारीची वेळ आल्याचे मित्रांच्या माध्यमातून समजताच फोनवरूनच त्यांना अन्नधान्य , किराणा आदी वस्तूंचे नियोजन करीत मदत केली यासाठी अंकुश बोरवडे, कमलेश बोरवडे, शंकर पडोळे, महेश सोनवणे यांनी सहकार्य करीत मित्राचा वाढदिवस स्मरणीय साजरा केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.