बीड दि.14 (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्यामुळे बीड जिल्हयातील विद्यार्थ्यांचा घरी बसून, स्कुल फॉर्म होम या उपक्रमातंर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य विषय समितीचे सभापती बजरंगबप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते माझी शाळा हे मोबाईल अॅप्लिकेशन मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी सर्वांसाठी खुले करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक व शाळापासून दूर रहावे लागत आहे. परंतू याही परिस्थिती विद्यार्थी अभ्यासाशी जोडले जावेत, वेळेचा सदोपयोग व्हावा, यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे आपल्याच शिक्षकांनी, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आपेक्षा जाणून घेवून ही निर्मिती करण्यात आली आहे.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून सदर मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता हे अप्लिकेशन स्प्ले स्टोरला उपलब्ध होण्यासाठी 5-7 दिवस लागू शकतात. दरम्यानचा वेळ वाया जावू नये, म्हणून फाईलच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांनी सदर मोबाईल अॅप इन्टॉल करून विद्यार्थ्यांना वापरास द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांनी सदर माझी शाळा मोबाईल अॅप सुरू केल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देवून जिल्हयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अॅपच्या माध्यमातून स्कुल फॉर्म होम उपक्रम राबवावा. सर्वागिण गुणवत्ता विकासासाठी या अॅपचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांनी व्यक्त केली.
Comments (1)
IT IS NICE APP FOR CHILDREN TO HELP STUDY
Leave a comment