बीड । वार्ताहर
शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला जेवडे धान्य मिळायला पाहिजे होते. तेवडे न देता पाच किलो तांदुळ कमी दिले अशी तक्रार शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील शेख नाजमिन याने दिल्यानंतर शिरूर येथील प्रकाश देसारडा यांच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आला. त्यामध्ये सदरील महिलेला देसारडा यांनी पाच किलो तांदुळ कमी दिले हे स्पष्ट झाल्यामुळे तहसीलदार यांच्या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी आघाव पाटील यांनी देसारडा यांच्या रेशन दुकानाचा परवाना निलंबीत केला आहे.
शिरुर शहरातील प्रकाश देसारडा यांच्या रास्त भाव दुकानास दहिवंडी (ता. शिरुर) येथिल शिधापत्रीका संलग्न करण्यात आल्या आहेत. येथील एका खोलित धान्य बबन पवार या कामगारा मार्फत कार्डधारकांना पावत्या शिवाय धान्य वाटप करण्यात येत होते. त्यानुसार नाजमिन याशिन शेख या नेहमी प्रमाणे शनिवारी (दि.11) रोजी रेशन आणण्यासाठी गेल्या. त्यांच्याकडील केशरी शिधापत्रीकेवरील सदस्य नोंदी प्रमाणे पाच किलो तांदुळ कमी दिल्याने नाजमिन शेख यांनी पवार यांच्याकडे पावतीची मागणी केली. मात्र नेहमीच मशिनची तांत्रीक अडचन सांगून पवार यांनी वेळ मारुन नेली. रेशन दुकानातील घडला प्रकार नाजमिन यांनी आपल्या पतींना यासिन यांना सांगीतला असता.राशन दुकानदाराच्या मनमानिला आळा घालण्यासाठी नाजमिन शेख यांनी रेशन दुकानदाराची जिल्हाधिकारी रेखावार याच्याकडे तक्रार केली.प्रकरणाचे गांभिर्य राखुन प्राप्त तक्रारीनुसार तहसिलदार श्रीराम बेंडे यांना कारवाईनुसार अहवाल पाठण्याचे आदेश देण्यात आले.त्यानुसार तहसिलदार श्रीराम बेंडे यांनी देसारडा यांच्या रेशन दुकानाचा एकूण धान्य कोठा,वाटप व शिल्लक धान्य साठा यासह तक्रारीच्या अणुषंगाने पंचनामा केला.आपत्ती काळात गरीब,गरजुंची उपासमार रोखण्यासाठी सामाजीक संस्था,दानशुर व्यक्ती पुढे येत असताना दुसरीकडे संवेदनाहीन रेशन माफिया मात्र संधीचा गैरफायदा घेऊन गरीबांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहेत.
तहसीलदार बेंडे यांनी चौकशी केल्यानंतर आपला अहवाल जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे पाठवला त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी हा प्रकाश देसारडा यांच्या राशन दुकानाचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या उपस्थितीमध्ये या दुकानातून कार्ड धारकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
Leave a comment