केज । वार्ताहर
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर कोरोना विषाणूच्या संकटाने लॉक डाउन असल्याने भीम अनुयायांनी आपल्या घरोघरी डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून आपल्या उद्गारकर्त्या महामानवाला अभिवादन केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असली की, जयंतीच्या अगोदर महिना ते दिड महिना अगोदर तयारी केली जाते. विचारवंतांची व्याख्याने, संस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा चोवीस-चोवीस तास अभ्यास आणि स्पर्धा व सामजिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे अशी अनेक भरगच्च कार्यक्रम असतात. तसेच भीम अनुयायी नवीन कपडे खरेदी आणि 14 एप्रिल दिवशी मोठ्या थाटामाटात लाखोंच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात येते. प्रचंड मिरवणुका काढल्या जातात. मात्र या वर्षी कोरोना विषाणूचे संकट जगावर घोंगावत आहे. देशात लॉक डाउन आणि संचारबंदी आहे त्यामुळे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांनी एकत्रित न येता प्रत्येक कुटुंबात व व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक घरात साजरी करण्यात आली.
केज शहरातील अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित मान्यवर यांनी आपापल्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून लाँकडाऊनचे नियम पाळून कोरोना संक्रमनाला दुर ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कायम खासदार सौ. रजनीताई पाटील, नगराध्यक्ष आदित्य पाटील तसेच भाजपाचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, बीड जिप चे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, नपचे गटनेते पशुपतीनाथ दांगट, हारूण भाई इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या सिताताई बनसोड, प्रा. हनुमंत भोसले, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय आरकडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, पत्रकार डिडी बनसोडे, गौतम बचुटे, अशोक सोनवणे, माजी नगराध्यक्ष छायाताई हजारे, माजी नगरसेवक कपिल मस्के, रिपाइं ता. अ. दिपक कांबळे, नगरसेवक शिवाजी हजारे, गोपाळ मस्के, लखन हजारे, बौद्ध महासभेचे अजय भांगे, अशोक गायकवाड इत्यादी प्रमुख मान्यवरांनी आपापल्या घरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.शहरातील भिमनगर, फुले नगर, क्रांतीनंगर येथे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याने केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके साहेब, पिआय प्रदिप त्रिभुवन साहेब यांनी केज वासीयांचे आभार व्यक्त केले आहेत.तसेच तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगर पंचायत कार्यालय, तालुक्यातील सर्व शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
Leave a comment