आष्टी/प्रतिनिधी
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कड्यातील डॉक्टर असोशियन यांनी मंगळवारी गावातील दोन हजार कुटुंबाची घरोघर जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत माणुसकीचे दर्शन घडविले.
कडा येथील डॉक्टर असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कोरोनाव्हायरस मध्ये घ्यावयाची खबरदारी व गावातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी चार वेगवेगळे पथके तयार करून मंगळवारी दिवसभर घरोघरी जाऊन सर्दी-खोकला-ताप आहे का ?अशी विचारणा करत तपासणी केली .ज्या रुग्णांना सर्दी-खोकला-ताप असा आजार आहे त्यांना गोळ्या औषधे मोफत देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.त्यांच्या सोबत आशा,अंगणवाडी सेविका,सरपंच उपसरपंच, ग्रा पं सदस्य उपस्थित होते.या उपक्रमात डॉ.पंडीत खिलारे ,डॉ. शिवाजी शेंडगे, डॉ.सचिन टेकाडे,डॉ. महेंद्र पटवा, डॉ. मार्कंडे ,डॉ. प्रमोद भळगट,डॉ. अविनाश शिंदे,कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अनिल आरबे,डॉ.उमेश गांधी,डॉ.माधव चौधरी,डॉ.संदेश देशमुख,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment