गेवराई । वार्ताहर
महारटाकळी येथील कोरोना संशयित रुग्णाचा निगेटिव्ह रिपोर्ट आला असला तरी त्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली. या संशयित मयत रुग्णाचा दफनविधी गेवराई तालुक्यातील महारटाकळीत मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास करण्यात आला आहे. यावेळी कुटूंबाने एकच आक्रोश केला. त्यानंतर आरोग्य कर्मचार्यांकडून दफनविधी करण्यात आला दरम्यान कोणत्या कारणाने या इसमाचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी (दि.14) सकाळी 9:30 च्या दरम्यान आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी रुग्ण वाहिकाद्वारे सदरिल इसमाचा मृतदेह महारटाकळी येथील घरासमोर आणले. कुटंबातील सदस्यांना 20 फुटाच्या अंतरावरुन मृताचा चेहरा दाखवला गेला, तेव्हा कुटूंबाने एकच आक्रोश केला. यावेळी वातावरण भावुक झाले होते. त्यानंतर दफनविधीसाठी आरोग्य कर्मचार्यांनी रुग्णवाहिका गावातील कब्रस्तान येथे मृतदेह घेवुन जात या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कॉरन्टाईन केलेले वडील,भाऊ,मुलगा यांच्यासह जवळच्या नातेवाईकांना इस्लाम धर्मानुसार जनाजा नमाज अदा करण्याची मुभा देण्यात आली. जनाजा नमाज झाल्यानंतर सर्वाना बाहेर काळुन पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंन्ट) कीट घालून आलेल्या आरोग्य कर्मचार्यांनी स्वत: सदरिल व्यक्तीचे दफनविधी केले.नंतर या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केली. यावेळी गावातील नागरिकांनी कब्रस्तान येथे मोठी गर्दी केली होती. दंगल नियंत्रक पथक चकलंबा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवुन नागरिकांना कब्रस्तानच्या आत येवू दिले नाही. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम,उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड,सहाय्यक पोलिस निरिक्षक देशमुख, डॉ कुलकर्णी यांच्या निगराणी खाली दफनविधी करण्यात आला.
सारीची लागणही नाही अहवाल आला निगेटिव्ह
संबंधित रुग्णाला सारी या आजाराची तर लागण झाली नव्हती ना? यासाठी मंगळवारी सकाळी त्याचे स्वॅब पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले,त्याचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
Leave a comment