आष्टी । वार्ताहर
कोरोना हे संकट देशावर आले यातून आपल्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आले यात जो व्यक्ती अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर पडतो याचे संरक्षण करण्यासाठी आ. सुरेश धस यांनी एक लाख तेरा हजार मास्क मोफत मतदार संघातील प्रत्येक गावात वाटप केले आहेत.
कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती असो स्वच्छता आसो या हरेक बाबीत आ. सुरेश धस यांनी पुर्णवेळ देऊन लागेल तेथे मदत करण्याची भूमिका बजावली आहे. या त्यांच्या कामगिरीने पोलीस, महसूल, आरोग्य, ऊसतोडणी कामगार, शेतकरी यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत झाली. तसेच गरिबांना किराणा ज्वारी बाजरी धान्य पुरवठा केला त्याच बरोबर आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत मार्फत शहरातील जनतेच्या सुरक्षितता जोपासत मतदारसंघात जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः खर्च करून गावातील घरातील प्रमुख अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लवाखाण्यात जाण्यासाठी घराबाहेर पडला तर त्याच्यासाठी एक लाख तेरा हजार मास्क मोफत वाटप केले. अजुनही मास्क सीलाईचे काम सुरुच आहे. कोरोनाचे गांभीर्य आ सुरेश धस यांनी घेतल्याने ग्रामीण जनतेला फार मोठा आधार व धीर मिळाला आहे. मोफत मास्क उपलब्ध करून दिल्याबद्दल जनतेकडून आ धस यांचे आभार मानले जात आहेत.
Leave a comment