आष्टी । शरद रेडेकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत माणुसकी मुर्दाबाद झाली आहे सख्खा मावस भाऊ देखील जवळ येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र सरकार ऊसतोड कामगारांचा सोपा प्रश्‍न जटील करू पाहत असल्याचे चिञ आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पडलेल्या साखर कारखान्यावर थांबवलेले ऊसतोड कामगार तसेच परतीच्या वेळी रस्त्यावरती अडकुन ठेवलेला ऊसतोड कामगार लॉकडाऊनच्या नावाखाली 14 तारखेपर्यंत थांबेलला होता.आत्ता मात्र तो 15 तारखेनंतर थांबेल असे वाटत नसल्याने सरकारने दोन दिवसात ऊसतोड कामगारांबाबतचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
कारखान्यावरती थांबलेल्या ऊसतोड कामगारांना जनावरांच्या चारा वाटपावेळी पाचशे ते हजारच्या संख्येने एकत्रित जमा केले जातात.यामुळे सोशल डिस्टन्स पाळला जात नाही.शेजारच्या शेतात गवत आणायला जर ते गेले तर त्यांना हुसकून लावण्याचा प्रकार घडत आहे.त्यामुळे प्रश्नांची गुंतागुंत वाढत आहे.अश्यावेळी कारखान्यादाराकडे असलेली यादी त्यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत ज्या त्या जिल्हाधिकार्‍यांना देऊन उसतोड कामगार गावी परतल्या नंतर त्यांना क्वारंटाईन करा अथवा वेगळी व्यवस्था करा.माणुसकी मुर्दाबाद झाल्याने लोक एकमेकांजवळ येणार नाहीत मात्र,त्यांना जर का सरकारने येण्याची परवानगी नाही दिली तर हे उसतोडे कश्याचीही वाट न पाहता.पायी गावी निघतील जर सरकारला ऊसतोड कामगारांचे हाल करायचे असतील सरकारने ते जरूर करावेत. असे माझे स्पष्ट मत असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांनी सरकारला सुचक इशारा दिला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.