गेवराई । वार्ताहर
शहरातील दोन किराणा दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून वेळेच्या आधी आपले दुकान उघडुन किराणा मालाची विक्री केली. या प्रकरणी बालाजी व कल्पतरू किराणा दुकान मालकावर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि.13) गेवराई शहरातील मेनरोड भागात घडली.
होलसेल विक्रेत्यांना माल विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकाळी साडे दहा ते दुपारी अडीच असा वेळ देण्यात आला आहे. परंतु गेवराई शहरातील मेनराड भागात असलेले बालाजी व कल्पतरू किराणा दुकान मालकाने सोमवारी सकाळी प्रशासनाने दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून आपले किराणा दुकान सकाळी साडेआठ वाजता उघडले व मालाची विक्री करू लागले. याची माहिती मिळताच नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोट, तलाठी राजेश राठोड यांनी किराणा दुकान मालकाला पकडले या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात किराणा व्यापार्यांवर गुन्हा नोंद केला.
Leave a comment