गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील चंकलाबा येथे ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.13) उघडकीस आली.
किशोर प्रल्हादराव टेकाळे (26, रा.पाथरवाला ताग़ेवराई) असे मयताचे नाव आहे.तालुक्यातील धुमेगाव ही त्याची सासरवाडी आहे. किशोर हा पत्नीसमवेत सासरवाडीत होता. रविवारी पती- पत्नीत किरकोळ वाद झाला होता. याचाच राग मनात धरून तो सासरवाडीतून चकलांबा येथे निघून आला होता.चकलांबा येथे पोलीस ठाण्याजवळच ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे. या टाकीला दोरीच्या सहाय्याने त्याने पहाटे दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही बाब निर्दशनास आली. चकलांबा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Leave a comment