गेवराई । अय्युब बागवान
गेवराई शहर व परिसरात बंद असतांनाही मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असूनही दारूची बाटली ज्यादाचे पैसे घेवून दिली जात आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे,जिल्हे लॉक आहेत मग ही दारू येते कुठून हा प्रश्न कायम आहे. या दारू विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रेमाचे संबंध असल्याने डोळेझाक तर करीत नाही ना? अशी ही शंका व्यक्त होत आहे. दरम्यान लॉकडाउन पाळले नाही म्हणून विविध दुकानावर कारवाया झाल्या आता चोरीछुपी दारू विकणारे यांच्यावर कधी कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा शिरकाव वेगाने होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अत्यावश्यक सेवा शिवाय सर्व बंद आहेत. मात्र दारू,बीयर सुरुच आहेत. त्यांची दुकाने बंद आहेत,पण वाटप सुरु आहे.‘पीने वालों को तो कहीं से भी मिलती है’ ही म्हण सध्या प्रचलित झाली आहे. गेवराई शहर व तालुक्यात शेकडो बार,देशी दारुची दुकाने,वाइनशॉप,बियरशॉपी आहेत.बाहेरुन सगळ बंद दिसते पण दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. आलेला दारुचा माल आणि विक्री यासाठी एक स्वतंत्र सेल आणि स्टॉक रजिस्टर असते. नोंद केल्याशिवाय दारुचा माल विकला जात नाही अन् खरेदी केला जात नाही मग बंदच्या काळात पूर्ण राज्य एक दुसर्याच्या जिल्ह्यात ही सीमा बंद आहेत असे असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात दारू येते तरी कुठून?
मध्यांतरी दारूबंदी विभागाच्या वतीने गेवराईत काही बार सील केले असल्याची चर्चा झाली पण ती बार कोणती याची कसलीच माहिती दिली जात नाही. हे अधिकारी कुठे असतात कधी बाहेर पडतात कोणती करवाई करतात याची धोरण काय आहेत. हे सर्व गुलदस्त्यात असते. कोणतीही कारवाई झाल्यानंतर त्याची माहिती प्रसार माध्यमांना द्यावी असे संकेत आहेत पण हे दारूबंदी अधिकारी त्यास बाँधील नाहीत का?असाही सवाल उपस्थित होतो.दोन दिवसापूर्वी केजमध्ये दोन तीन बियरशॉपी व बार परमिटरूमवर छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याने त्यांच्या विरुद्ध सदर अनुज्ञप्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे; परंतु आता पयंत गेवराईत किंवा तालुक्यात चालू किंवा बंदमध्ये मुंबई विदेशी मद्य नियम 1953 चे नियमांचे उलघंन केल्या प्रकरणी अद्याप असा एखादा गुन्हा दाखल झाल्याचे ऐकिवात नाही.कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात जिल्हाधिकार्यानी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदचे आदेश दिलेले आहेत. किराणा दुकान,पेट्रोल पंप,बोगस डॉक्टर,बाहेर फिरणार्या लोकांना फटके बसले. नायब तहसीलदार प्रशांत जाधवर तर पोलिस अधिकार्यांच्याच भूमिकेत काम करतांना दिसत आहेत. त्यांना वरिष्ठ अधिकारी वर्गाचीही साथ मिळत आहे.पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चौभे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, ऐटवार धडाकेबाज कारवाया करत आहेत. या धर्तीवर आता बारवाले,गुटखा विकणारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन चोरीछुपे हा व्यवसाय करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, त्यांचे परवाने निलंबित करावेत. छोट्या-मोठ्या व्यापारी, हातगाडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आता या दारू विक्री करणार्यांवर कारवाया कराव्यात अशी मागणी होत आहे.
Leave a comment