भाडेकरूंना केला अर्धा किराया माफ तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
पाच भावंडानी दिला एकवीस हजारांचा धनादेश!
शिरुर कासार
बाळकृष्ण मंगरुळकर
कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये शहरातील गाडेकर बंधूंनी एकवीस हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार श्रीराम बेंडे यांना सुपूर्द केला आहे.
शहरातील व्यापारी दिनेश गाडेकर यांनी आपले बंधू गणेश,उमेश,प्रवीण आणि प्रशांत यांना विचारात घेऊन जे किरायादार आहेत त्यांचे अर्धे भाडे माफ करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देखील एकवीस हजार रुपये देण्याचा संकल्प केला होता.आपल्या बंधूंच्या संकल्पनेला सर्वांनी संमती देत या संकट समयी देशकार्य समजून सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे आज दुपारी तहसीलदार श्रीराम बेंडे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या नावाने एकवीस हजार रुपयांचा धनादेश दिला.या वेळी तलाठी निळकंठ सानप,अमोल रणखांब यांची उपस्थिती होती.
आणखी मदत देणार!
एकवीस हजार रुपयांचा धनादेश देवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.दुकाने बंद असल्यामुळे माणुसकीच्या नात्यातून किरायादारांना अर्धे भाडे माफ करण्याचा निर्णय आम्ही पाच बांधवांनी मिळून घेतला आहे.राज्यातील नागरिक देखील आपलेच आहेत या भावनेतून हि मदत केली आहे.भविष्यात गरज पडली तर किराणा मालाचे गरजू नागरिकांना देखील वाटप करणार असल्याचे युवा नेते दिनेश गाडेकर यांनी सांगितले.
Leave a comment