बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे, अनेक जणांच्या घरात कापूस मोठ्याप्रमाणात शिल्लक आहे. तूर, हरभरा यासह इतर धान्य विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने शासकीय हमी भावाने कापसासह सर्व धान्य खरेदी तात्काळ सुरू करून धान्याचे चुकारे वेळेत शेतकऱ्यांना अदा करावेत अशी मागणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पणन व सहकार मंत्री, राज्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली. लवकरच शासकीय खरेदी सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून सरकार सकारात्मक असल्याने लवकरच शासकीय धान्य खरेदी सुरू होणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीपूरक उद्योग सुरु ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्या तरी शेतकऱ्यांना त्यांचे धान्य, फळं, भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आणतांना मोठ्या अडचणी येत आहेत. कापूस, तूर व इतर धान्य विक्री कशी करायची? असा प्रश्न शेतकरी विचारात आहेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी राज्याचे पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या बरोबर दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडले. याविषयी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सुध्दा त्यांनी चर्चा केली. शेतीसाठी डिझेल व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.

दोहों मंत्री शासकीय कापूस आणि धान्य खरेदी सुरू करण्यासाठी अनुकूल असून कोरोनाच्या लॉक डाऊन काळात कापूस व धान्य खरेदी करण्यासाठी वेळेचे, गर्दीचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय याबाबत नियोजन करून लवकरच खरेदी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून या बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा लक्ष घातले आहे, अशी माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून यावर्षी शासकीय कापूस खरेदी विलंबाने झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात मोठया प्रमाणात कापूस शिल्लक राहिला, उन्हाळ्यात वाढणारे तापमान आणि आगीच्या घटना लक्षात घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने शासन निर्णय घेत असल्याचे अमरसिंह पंडित यांनी शेवटी सांगितले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.