मंठा । वार्ताहर
अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे मंठा परतूर जालना व घनसावंगी यासह आठही तालुक्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज 10 रोजी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवले जाणार आहे.
यासाठी ज्या गावातील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांनी व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे हि विनंती. निवेदन देण्याची वेळ व स्थळ मंठा तालुक्यातील निवेदन वेळ- सकाळी 11 वाजता स्थळ- तहसील कार्यालय मंठा, घनसावंगी तालुक्यातील निवेदन, वेळ- सकाळी 11 वाजता स्थळ- तहसील कार्यालय घनसावंगी, जालना तालुक्यातील निवेदन, वेळ- दुपारी 1 वाजता ,स्थळ- तहसील कार्यालय जालना.
Leave a comment