बीड । वार्ताहर
नागरिकांना फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून याची सुरुवात चाणक्यपुरी बीड येथे फळे व भाजीपाला विक्री करणार्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश वरिष्ठ स्तर शरद देशपांडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
आज सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजता या कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर गोडबोले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसीलदार सचिन खाडे, जिल्हा सरकारी वकील अॅड.अजय राख, अॅड. सानप, जिल्हा न्यायालय बीड कोर्ट मॅनेजर पिंपळे, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, शेतकरी दत्तात्रय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला याचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता कृषी विभागाकडे नोंदणी करणार्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गट यांना रात घरोघरी फिरून फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना देण्यात आला आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ यांना दिलेल्या परवाना नुसार सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेमून दिलेल्या विभागात फिरून भाजीपाला विक्री करण्यात येणार आहे.
Leave a comment