जालना । वार्ताहर
देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा हि प्रसिद्ध आहे महात्मा जोतीराव फुलेंनी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडीअडचणींना सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिले त्या भिडेवाड्याची आज अवस्था खूपच दयनीय झालेली आहे. या ठिकाणची दुरावस्था होणे तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे.
या वास्तूस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे हि मागणी शासनाकडे वेळोवेळी करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून शासनाने पहिली मुलींची शाळा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक लवकरच घोषित करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्यावतीने जन आंदोलन उभा करण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन घनसावंगी तहसीलदार मार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आले. यावेळी सपना गाढवे, शरद कोरडे, नामदेव गाडेकर, जनार्दन बरवकर, आनंद कडुकर सह सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment