जालना । वार्ताहर
दोन दिवसांपासून रक्तासाठी अडचनीत असलेल्या पळसखेडा येथील अकाशाला रक्तदान देण्यासाठी एका गृहरक्षकने (होमगार्ड) सामाजिक दायत्व दाखवत रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जालना तालुक्यातील पळसखेडा येथील आकाश जाधव हा थालेसीमिया हा आजार आहे. त्याला निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. परंतु जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुडवडा आसल्याने रक्त मिळणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपचे गणेश चौधरी यांना या बाबतची माहिती मिळाली. गणेश चौधरी यांनी लागलीच रक्त कुठून व कसे मिळेल यासाठी धावाधाव केली. त्यांनतर गणेश चौधरी यांचे मित्र गृहरक्षक(होमगार्ड) म्हणून कार्यरत असलेले गणेश (लक्ष्मीकांत) पैंजने यांना रक्तदान करण्यासंदर्भात प्रोत्साहीत केले.
गणेश चौधरी यांनी पैंजने यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ कुठे येऊ आणि कधी रक्तदान करायचे सांगा असे सांगितले. तुला नंतर लगेच जनकल्याण रक्तपेढीमध्ये जावून पैंजने यांनी रक्तदान केले. यामुळे दिवसापासून रक्तासाठी अडचणीत असलेल्या आकाशला आज वेळेवर रक्त मिळाले. कोरोनाच्या काळात दिवसरात्र एक करून काम करणारे व प्रसंगी रक्तदान करून आकाशला मदत करणारे गणेश पैंजने यांनी खर्या अर्थाने सामाजिक भूमिका निभावली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुप जालना कडून कौतुक करण्यात येत आहे. गणेश चौधरी हे 17 वर्षांपासून आकाश जाधव यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आकाशला वेळोवेळी रक्त पुरवडा करण्याचे काम गणेश चौधरी ब्लड ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे.
आकाश जाधव हा मुलगा जालना तालुक्यातील पळसखेडा येथील आहे. त्याला महिन्यातून 2 ते 3 बॅग रक्त द्यावे लागते. आणि विशेष म्हणजे त्याचा रक्तगट- निगेटिव्ह आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने रक्तदान शिबीरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नियमित रक्तदानाची आवश्यकता असलेल्या रुग्णांना रक्त मिळत नाही. त्यामुळे युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात यावी. जेणे करून रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही, असे आवाहन गणेश चौधरी ब्लड डोनरचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी केले आहे.
Leave a comment