संघर्ष हा कोरोना विरोधात करायचा आहे .....!
वडवणी -सुधाकर पोटभरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या सामाजिक- राजकीय क्षितिजावर 1920 साली उदय झाला .या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षे पुर्ण होत आहेत.
त्यामुळे हि भीम जयंती विशेष आहे.
बाबासाहेबांनी अस्पृश्य ,वंचित ,दिनदुबळया समाजीक घटकांच्या उद्धाराची ,न्याय हक्काची लढाई १९२० च्या दशका पासुन अधिक तीव्र केली. हि न्याय हक्काची लढाई सामाजिक,राजकीय, आर्थिक ,पातळीवर लढवली गेली .बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हि लढाई आक्रमक ,अभ्यासपूर्ण लढवली आणि जिंकली सुद्धा व अस्पृश्य,दिनदुबळया ,वंचितना त्यांना त्याचे हक्क मिळवून दिले.
बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ,पत्रकार,कायदेपंडीत,म्हणुन त्यांनी काम केले.तसेच ते बहिष्कृत सामाजाचे नेते कामागार ,कष्टकर्याचे नेते म्हणून त्यांनी काम केल. सगळ्यात जोखमीच महत्त्वच काम त्यांनी केल ते म्हणजे 'भारतीय राज्यघटना, "संविधान" लिहण्याच. व भारतीय राज्यघटना हि जगातील सर्वोत्तम, मोठी राज्यघना त्यांनी लिहली .यामध्ये देशातील सर्व घटकांचा समावेश केला.आदिवासी ,स्पृश्य-अस्पृश्य,गोरगरीब ,व स्त्रीया , अल्पसंख्याक,शेतकरी, शेतमजूर ,कामगार, विद्यार्थी या सर्वांना बाबासाहेबनी 'संविधानाच्या" माध्यमातून न्याय हाक्क मिळून दिला.आज जे काही गोर गरीबा, दिनदुबळी, लोक संघर्ष करत आहेत ,लिहीतात,बोलतात, व चागल जीवण जगत आहोत हे सगळे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'अभ्यास,संघर्ष,व त्यागाच्या लढ्यामुळे,शक्य झालेल आहे हे आपण विसरता कामा नाही.
आपल्या सर्वसाठी एक महत्वपूर्ण संदेश दिला तो म्हणजे , शिका,संघटीत व्हा , संघर्ष करा . हा संदेश आज या वर्तमान परिस्थितीत आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. आपण शिक्षण घेऊन आपल्या देशात , सभोताली घडणाऱ्या घटनेवर गोष्टवर विचार करून बोलन लिहन ,व प्रबोधन केल पाहिजे आणि खर काय खोटे काय हे शिकक्षीत लोकांनी समजाला सांगितले पाहिजे .संघटीत ,एकत्र येऊन आपण आपले प्रश्न,समस्या,गोष्टी सोडवल्या पाहिजे ,त्यासाठी लढा उभारवा तोही संविधानीक विधायक मार्गानेच... सगळ्यानी मिळवून संघर्ष केला पाहिजे व तो वेगवेगळ्या मार्गाने साधनाने एकत्रित एकसंघपणे संघर्ष करून न्याय मिळवला पाहिजे.
आज या शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशाचीे देशाला,जगाला गरज आहे कारण आज "करोना" covod 19 या विषाणू रोगांची "महामारी" जगभरात पसरली आहे . व भारतात सुद्धा या महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
जगातील बरेच देश या महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.यामधे आपला संपूर्ण भारत देश २१,दिवस लॉकडाऊन होता .काही राज्यसरकारने जमावबंदी , लॉकडाऊन अधि पासुन केल आहेत. आता पुन्हा लॉकडाऊनचा काळ वाढवला आहे. आपण जे मागच्या २१,दिवसाच्या लॉकडाऊन मधे ज्या चुका केल्या जशी पाहिजे तशी आपण सुरक्षितता, काळजी घेतली नाही . जी लोक परदेशातुन देशा मधे आली त्यांनाची चाचणी करून त्यांना
विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले.काहींना घरातच वेगळ(विलीकरण)राहण्यास पारवानगी दिली.ज्या लोकांना Home Quarantine दिले होते ते लोक घरात नबसता इकडे तिकडे फिरत राहिले.काही लोक त्यांना भेटात राहिले यामधे नागपूर येथे एक व्यक्तीला Home Quarantine दिल त्याला दुसरे २ व्यक्ती भेटायला गेल्या व त्यांना हि कयोनाची लागण झाली.असेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात एका कुटुंबातील एक व्यक्ती हि परदेशातुन आली त्यांना Home Quarantine दिल ते सार्वजनिक घरगुती कार्यक्रमत गेली आणि त्याच्या परिवारातील २१ जनाना करोनाची लागण झाली . तसेच मुंबई येथे एका किराणा दुकानदाराला परदेशातुन आलेल्या व्यक्तीकडुन कोरोणाची लागन झाली, करोना रोगाचा संसर्ग झपाट्याने वाढला. देशभरात गाजलेल प्रकरण म्हणजे निजामुद्दीन मरकज जमात या जमातीच्या कार्यक्रमात जे लोक सहभागी होते त्यातील २०० च्यावर व्यक्तीना करोनाची लागण झाली.ते देश भर पसरले आणि करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला.असे अनेक प्रसंग उदाहरणा घडलेले आहेत
या करोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या ६०.डॉक्टरांर, ३२ नर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांना सुद्धा करोनाची लागण झाली यामधे काही २ पेक्षा अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला . हे डॉक्टर आणि नर्स ब्रदर्स, यांना जी लागन झाली आहे ती त्यांना PPE स्पेटी किडच अधिक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे झाली काही ठिकाणी डॉक्टरांनी आंदोलन केली आम्हाला किट उपलब्ध करून द्यावी.व करोनाची चाचणी करण्याच्या प्रयोगशाळा कमी होत्या त्यामुळे करोना पॉझिटिव्ह , नेगेटेव्ही आहे हे समजायला वेळ लागला. या सगळ्या आपल्या चुका मुळे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला .या झालेल्या चुकां पुन्हा आपण करू नये .या चुका आपण टाळूयात.
त्यामुळे
"करोना" काय आहे त्याची लक्षण काय आहेत यांचा आपण अभ्यास केला पाहिजे .व इतर देशांचे काय हाल्ल चालू आहेत जसे की इटली,अमेरीका , स्पेन, या देशांची परिस्थिती पाहून यातुन आपण "शिकल" पाहिजे आणि प्रतिबंधक उपायोजना केल्या पाहिजेत आणि आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे .नियम पाळले पाहिजेत. शासन,आपण व संपूर्ण देश हा "संघटीत"होऊन या करोना महामारी च्या विरोधात लढत आहोत .यामधे डॉक्टर,नर्स, पॅरामेडिकल स्टाफ,पोलीस,जीवनआवश्यक, वस्तू पुरवणारे लोक हे संघटीत पणे "संघर्ष"करत करोनाला हारवत आहेत
.त्यामुळे आपण घरात बसुन या करोनाला हारवू शकतो . त्यामुळे घरांच्या बाहेर पडू नका नियम पाळा आणि करोना टाळा. तुम्ही आम्ही या करोना महामारीत "आरोग्य"व सुरक्षित राहण्याच्या गोष्टी "शिकू" आणि त्याला 'संघटीत'पने "संघर्ष" करूत उत्तर देऊ व या संकटातून माहामारीतून बाहेर पडू .
बाबासाहेबनी व महामानवानी दिलेला संदेश हा लाख मोलाचा असतो.हे आज या वर्तमान परिस्थितीत पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे.
माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखनीच्या बळावर प्रास्थापित व्यवस्थेवर आसुड ओढणारे सामाजिक,राजकीय, आर्थीक क्रांतीचे उद़गाते.भारतरत्न बोद्धीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त " क्रांतीकारी अभिवादन " व तमाम जनतेस हार्दीक शुभेच्छा
लेखक - प्रा.ओम पुरी सर
Leave a comment