डोंगरकीन्ही /अमोल येवले
लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर राशन दुकानांवर स्वस्त आणि मोफत धान्य वाटप सुरू आहे. त्याचं पार्श्वभूमीवर गुरुजी आता छडी घेऊन नागरिकांना, कोरोना व्हायरस विषयी सोशल डिस्टन्सचे धडे देत,महत्व सांगत राशन दुकानांवर उभे राहिल्याचे चित्र आज डोंगरकीन्ही येथे राशन दुकानांवर दिसले.
डोंगरकीन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे शिक्षक रामहरी शेळके सर यांनी आपले कर्तव्य चोख बजावत नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेऊन राशन घेण्यास सांगत होते.राशन दुकानदार चालक यु. एस .येवले , मुकेश येवले, शंकर रायते ,भाऊसाहेब तुपे, गोरख घाडगे, व नागरिकही यांना प्रतिसाद देत राशन घेत होते. त्याच बरोबर गावातील इतर राशन दुकानांवर नियुक्त शिक्षक जोशी मनोहर सर, रोडे उत्तरेश्वर सर ,अशोक जायभाय सर, राजेंद्र ढाकणे सर नियुक्ती होती. दोनच दिवसांपूर्वी डोंगरकीन्ही मध्ये शनिवारी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. पण आज राशन दुकानासंमोर गुरुजी छडी घेऊन उभे ठाकल्याने कमीत कमी आज तरी डोंगरकीन्हीत सोशल डिस्टन्स पाळल्याचे दिसून आले.त्याच बरोबर आता किराणा दुकानावरही आता कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे झाले आहे. किराणा दुकानांवर मात्र गर्दी दिसून आली.
Leave a comment