पोळा सणानिमित्त बैल साज विक्री होईना दुकानदारांचे नुकसान
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ता. 12 बुधवार रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार भरला नसल्याने बैलपोळ्याचा, बैलाचा साज विक्रीसाठी आणलेल्या व्यापारी परतले बुधवारी आठवडी पोळ्याचा बाजार भरला नाही .वर्षभर बळीराजा सोबत शेतात राब राब राबणार्या सर्जा-राजाच्या पोळा सणावर करोणाचे संकट वाढत चालल्याने या वर्षी बैल पोळ्यावर कोरोणाचे सावट दिसून येत आहे.
यावर्षी उत्साहाने बैलपोळा साजरा होणार नसल्याचे दिसून येत आहे वर्षभरात सर्जा-राजाच्या एकच सण पोळा हा साजरा होतो व यावर्षी पोळा सणाचा एकच बाजार तोही भरला नसल्याने व्यापार्याचा माल पडून आहे. कोरोनामुळे ग्राहकी नसल्याने त्यामुळे बैलाचा पोळा सणानिमित्त खरेदी करून ठेवलेला माल विक्री होत नसल्याने वयापा-यांचे मोठे नुकसान होणार आहे कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गंभीर परिस्थिती मुळे येंदा मात्र बैलाचा पोळा सण साधल्या पध्दतीनेच करावा लागणारा आहे साज खरेदी करता न आल्यामुळे त्यामुळे व्यापार्याची मोठे नुकसान होत आहे.कोरोना मुळे शेतकर्यांमध्ये उत्साह राहिला नाही.
कोरोनाच्या काळात होलसेल माल मिळण्यास अडचणी आल्या, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहकी होईल या आशेने बैल पोळा सना निमित्त बैलाचा साज मोठ्या प्रमाणावर वेसणी ,मोरक्या, कासरे, घागरमाळ ,झुल्या रंगीबेरंगी हिंगुळचे डबे आदी पोळ्याच्या सनाला लागणारे साज साहित्य 1 ते 1:50 एक ते दिड आधीच खरेदी करण्यात आला परंतु पोळ्याचा एकच आठवडी बाजार तो हि भरला नसल्याने बैलाचा साज विक्री झाला नाही. काही मालाचा डाग खोलले सुधा नाहीत व्यापार्यास त्याचा मोठा फटका बसला आहे बैलपोळा सना निमित्त बैलाचा साज विक्री दुकानदार - संतोषराव गबाळे कुं.पिंपळगाव.
Leave a comment