समाजाबरोबरच वंचितांची सेवा करतच राहणार!
जालना । वार्ताहर
महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुखपदी जालना येथील सामाजिक कार्यकर्ते, जालना बाजार समितीचे संचालक तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री. भाऊसाहेब घुगे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक पदांची जबबादारी सांभाळतांनाच वंजारी सेवा संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आता पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे समाजाबरोबरच वंचितांच्या सेवेसाठी आपण अधिकच तत्पर राहूत, अशी आश्वासक प्रतिक्रिया भाऊसाहेब घुगे यांनी व्यक्त केली आहे. वंजारी सेवा संघ ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. या संस्थेने स्थापनेपासून आतापर्यंत अनेक सामाजिक कार्ये हिरारिने राबवून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. या संघटनेची नुकतीच विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाऊसाहेब घुगे हे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असून महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे जालना जिल्हा अध्यक्ष आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असतांनाच श्री भाऊसाहेब घुगे यांनी ग्रामीण विकास प्रतिष्ठान बदनापूरचे अध्यक्ष म्हणूनही अनेक जनहिताची कामे केलेली आहेत.
शेतकर्यांविषयी जिव्हाळा असलेल्या घुगे यांनी नाम ङ्गाउंडेशनच्या माध्यमातून बदनापूर तालुक्यात त्यांनी जलयुक्त शिवारचे खूप मोठे कार्य केलेले आहे. याच कार्याची दखल घेऊन त्यांची नाम ङ्गाऊडेशनचे जालना समन्वयक त्यांच्यावर जबाबदारी सोपण्यात आली. त्यानंतरच्या कालावधीत राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील अनेक गावात जाऊन वंचितांना मोङ्गत किराणा सामान, मास्क, सॅनिटायझरचे वितरण करुन सामाजिक कार्ये केलेले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गीते, महासचिव बाजी दराडे, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, उपाध्यक्ष अमोल कुटे, युवा आघाडीचे राज्य प्रमुख प्रकाश आव्हाड, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख डॉ.मंजुषाताई दराडे,महिला कार्याध्यक्षा सौ.सविताताई मुंढे, राजेंद्र राख जालना ,डॉ.श्रीमंत मिसाळ जालना , दीपक दराडे जालना यांच्यासह प्रदेश पदाधिकारी संतोष ताठे औरंगाबा ,विष्णु जाधवर नांदेड , ज्ञानोबा नागरगोजे नांदेड ,प्रा. गुणवंत जाधवर उमरग विजय ढाकणे जिंतूर परभणी ,भाऊसाहेब मिसाळ बीड यांनी सर्वानुमते ही निवड केली आहे.ङ्गङ्गमराठवाडा अध्यक्ष संजय काळबांडे जालना ,विभागीय कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.विठ्ठलराव घुले परभणी,विभागीय सरचिटणीस .सुग्रीव मुंडे लातूर, विभागीय उपाध्यक्ष सुधाकर लांब बीड,भास्करराव बोंदर उस्मानाबाद , विभागीय कोषाध्यक्ष वाल्मीक गीते जालना,विभागीय संपर्कप्रमुख प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये परभणी, वैजनाथ वाघ औरंगाबाद ,विभागीय चिटणीस .राजू सानप औरंगाबाद,विभागीय संघटक .नारायण गीते बीड ,.नारायण मुंडे औरंगाबाद , मोहन मुंडे जालना,विभागीय सहसचिव .भाऊसाहेब खाडे औरंगाबाद , .ज्ञानदेव कांगणे जालना,.अशोक गीते नांदेड जिल्हाध्यक्ष ,डॉ. दशरथ मुंडे नांदेड जिल्हा सचिव ,गजानन मुंडे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा संदीप हुशे जालना जिल्हाध्यक्ष,प्रा ज्ञानेश्वर नागरे जालना जिल्हा कार्याध्यक्ष व जगत घुगे जिल्हा सचिव जालना तसेच सर्व राज्य व विभागीय कार्यकारिणी व सर्व जिल्हाध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment