तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथे शेतकरी मेळावा व शिवार ङ्गेरीचे आयोजन केले. यावेळी विविध पिकांना भेट देऊन त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे, डॉ.एस.बी. पवार, डॉ. रामेश्वर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, डॉ.सचिन धांडगे, उपसरपंच सुनील कोरडे, रमेश धांडगे, मंडळ कृषी अधिकारी रवी भोसले, कृषी सहाय्यक संजय लोंढे उपस्थित होते.यावेळी विभागीय कृषि सहसंचालक दिनकर जाधव यांनी शेतकर्यांनी एकत्र येऊन गटशेती करावी व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या माध्यमातुन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावे, कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे तसेच ङ्गवारणी करताना घ्यायच्या काळजीबाबत डॉ. एस.बी पवार यांनी मार्गदर्शन केले , मोसंबी बागेला भेट देऊन मोसंबी ङ्गळगळ समस्या बाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. रामेश्वर ठोंबरे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी केले, सूत्रसंचालन सुनील कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक संजय लोंढे यांनी केले यावेळी वैभव कोरडे, राजश्री पुरी, सक्ेहल धायगुडे, सुधाकर ढगे, अमोल कोल्हे, पांडुरंग देठे, अक्षय सोनवणे, मुरलीधर गाढवे, वशिष्ट रेंगे, किरण खादगिणे, केशव कचकलवाड, तुकाराम डोईङ्गोडे , अर्जुन सुरडकर, पूजा राकुसळे , दुधाटे, गायकवाड, शिंदे, ठाकरे शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment