बदनापूर । वार्ताहर
जिल्हाधिकारी यांनी आपत्ती निवारण कायद्याअतंर्गत सामाजिक अंतर ठेऊन चेहर्यावर मास्क घालूनच व्यवसाय करण्याच्या सूचना दिलेल्या असताना या नियमांचा भंग करत असलेल्यांवर कारवाईसाठी तहसीलदार छाया पवार स्वत: रस्त्यावर उतरून नगर पंचायत कर्मचार्यांसह 30 जणांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी तहसीलदार शहरात कारवाई करत असताना तहसील परिसरात मात्र गर्दी व विनामास्क गर्दी दिसून येत होती. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्या नुसारच जिल्हाधिकारी जालना यांनी संपूर्ण जिल्हयात आपत्ती निवारण कायद्यातंर्गत विविध आदेश दिलेले आहे.
त्या नुसार चेहर्यावर मास्क लावणे तसेच ङ्गिरताना सामाजिक अंतर राखणे गरजेचे असताना नागरिक या आदेशाचा भंग करत असल्याचे निदर्शनाय येत असल्यामुळे बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार या स्वत: शहरातील रस्त्यावर उतरल्या. त्यांनी नगर पंचायतच्या कर्मचार्यांसह शहरातील मुख्य रस्त्यावर ङ्गिरून विना मास्क असणार्या 30 जणांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान तहसीलदार शहरात नगर पंचायत कर्मचार्यासह कारवाई करत असतानाच महसूलचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालय परिसर मात्र गर्दीने ङ्गुलून गेलेला होता. विना मास्क, सोशल डिस्टनसिंग न पाळता येथे मोठी गर्दी दिसत असूनही महसूल अधिकारी कर्मचारी मात्र या कडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. एकंदरीत तहसीलदार करत असलेली ही कारवाई म्हणजे काखेत कळसा व गावाला वळसा अशी दिसून येत असल्याची प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत होते.
Leave a comment