बदनापूर । वार्ताहर
राज्यातील भुविकास बँक कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली असून आता राज्यसरकारने तातडीने प्रलंबित मागण्या 14 आगस्ट पुर्वी मान्य कराव्यात नसता मंत्रालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे आर एस जर्हाड यांंनी दिला आहे . दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने 24 जुलै 2015 च्या काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा भुविकास बँक बंद करण्याचा निर्णय झाला .त्यापुढे कर्मचार्यांच्या बाबतीत कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. शासन निर्णयानुसार बँकाची मालमत्ता विकून त्यामधून येणार्या रक्कमेतुन संबंधित बँकेंचे अधिकारी व कर्मचारी (सेवानिवृत्तीसह ) यांना रक्कम देण्यासाठी, विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत . त्यासाठी शासनाने भुविकास बकांची मालमत्ता ताब्यात घेवून , शासनानेच कर्मचारी वर्गाची , आर्थिक देणी द्यावीत या बाबतचा मंत्री मंडळाचा प्रस्ताव सहकार विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलेला आहे . या बाबत संघटनेचे आध्यक्ष खा. आनंदराव अडसुळ यांनी नियमित पाठपुरावा केला होता.
मात्र तरीही अर्थ विभागाने या प्रस्तावर कोणतीही कार्यवाही अद्याप पर्यंत केलेली नाही. परीणामी सर्व कर्मचारी व त्यांचे कुंटूब आर्थिक अडचणीत आले असून जालना जिल्ह्यात एकूण 82 कर्मचारी असून सध्या ङ्गक्त 6 कर्मचारी कार्यरत असून यासर्वाचे जालना जिल्ह्यातील कर्मचार्यांचे एकूण 9 कोटी 58 लाख रुपयाची पगार थकबाकी असून यामुळे कर्मचार्यांच्या मुलांचे शिक्षण , कुंटूबाचे आरोग्यासाठी लागणारी औषधपाणी आदी विविध अडचणीमुळे काही कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत .ही अतिशय गंभीर बाब असूनही शासनस्तरावरुन दुर्लक्ष होतांनी दिसून येत आहे .तरी ङ्गाईल क्रमांक एल. डी.बी ./ 1015 /प्र क्रमांक 28 / सी .का.ना.767 या प्रलंबित प्रस्तावावर 14 आगस्ट 20 पुर्वी निर्णय न घेतल्यास भुविकास बँक कर्मचार्यांना मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही , असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . भुविकास बक कर्मचार्यांच्या मागणी नुसार आम्ही आमच्या कार्यालयाकडून शासनास 2018 मध्ये प्रस्ताव सादर केलेला असून संबंधित जालना जिल्हा भुविकास बकची जागा ही शासनाची असून तीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू आहे .ती शासनस्तरावरुन पुर्ण अद्याप पर्यत पुर्ण झाली नसून आमच्या कडून पाठपुरावा चालू आहे.
Leave a comment