जालना । वार्ताहर
येथील देवगिरी विद्या प्रतिष्ठाण संचलीत देवगिरी ईग्लीश स्कुल जालना या शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली. मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असुन शाळेतील विद्यार्थिनी कु. माधुरी धनवे हिने 89 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. अंजली खंदारे हिने 85.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर गणेश शिंगाडे याने 84 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कु. मेघा कांबळे 80.80 टक्के, सोपान शेळके 77 टक्के, श्रीकृष्ण शिराळे 76.60 टक्के, करण खरात 75.40 टक्के, ऋषीकेश वाघमारे 73.80 टक्के असे गुण मिळवले.
विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष रामकिसन मोरे, माजी सचिव संतोष लहाने, वर्तमान अध्यक्ष बबन दादा सोरटी, वर्तमान सचिव प्रा. गायत्री सोरटी, माजी संचालक प्रल्हाद मोरे, दत्तात्रय मोरे, अॅड. विजय इंगळे, कचरूलाल गिल्डा, अरूण दरक, अॅड. दशरथ शिराळे, राजेंद्र मुळे, दिवाकर मगरे, नारायण लांडगे, वर्तमान संचालक प्रदिप भाई सोरटी, मंगेश सोरटी, भारती सोरटी, वेदांत सोरटी, रामेश्वर हिवाळे, योगेश सोळंके यांच्यासह मुख्याध्यापीका श्रीमती माधवी कसोटे, उपमुख्याध्यपक मोहम्मद रङ्गी, क्रीडा विभाग प्रमुख शेख चाँद पी.जे., यांच्यासह शिक्षक श्रीमती रेखा पिल्लई, अर्चना जाधव, आरती वाघमारे, अभिजीत चौधरी, अविनाश कांबळे, गजानन क्षिरसागर, सपना जाधव, सोनाली प्रगने, सुनीता कुहीरे, कमला ठाकुर, रोझलीन वाकडे, शिल्पा गीरी, परशुराम खांडेकर, मंदा खंदारे, राजेश काळे आदिंनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment