भोकरदन । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील या वर्षी ही दहावी च्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असुन तालुक्यातील 34 शाळांचे दहावी चे निकाल 100% लागले असुन भोकरदन तालुक्यात एकुण 6466 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी 6240 विद्यार्थी पास झाले असल्याने तालुक्याचा दहावीचा निकाल हा 96.59% लागला आहे. व नेहमी प्रमाणे याही वर्षी मुलीनीच बाजी मारली आहे.
भोकरदन तालुक्यातील विविध शाळाचे निकाल पाहुन केंद्रीय मंत्री खा रावसाहेब पा दानवे, आ संतोष पा दानवे, सौ निर्मला ताई दानवे, सौ रेणुताई संतोष दानवे, माजी आ.संतोषराव दसपुते, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, एल के दळवी, शब्बीर कुरेशी,, शालीकराम गोरे, संजय पैठणकर, विकास वाघ, मानिक दानवे, खडके सर धावडा ,मोहिते सर राजुर, अमोल कड, पुंडलिक फुके, गाढे सर वरूड, रावसाहेब कोरडे खामगाव, यांनी आपल्या संस्थेच्या विद्यालयाचे, गुणवंत विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. भोकरदन तालुक्यातील काही विद्यालयाचे निकाल पुढील प्रमाणे
शिवाजी हायस्कूल भोकरदन 99.60%, श्री छञपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी 94.23% संत ज्ञानेश्वर विद्यालय हसनाबाद 98.12%,मोरेश्वर विद्यालय राजुर 97.22% ,रावसाहेब दानवे विद्यालय धावडा 100%, दशरथ बाबा विद्यालय जवखेडा100%, नुतन विद्या मंदीर भाकरवाडी 96.87%,स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय खामगाव 99.29% न्यु हायस्कूल भोकरदन 93.63% ,गणपती इग्लिश स्कुल भोकरदन 100%,प्रियदर्शनी विद्यालय भोकरदन 96.22%, अलहुदा उर्दू हायस्कूल भोकरदन 90.90%, कस्तरबा गांधी विद्यालय भोकरदन 100%,नॅशनल उर्दू हायस्कूल भोकरदन 100%,आत्मानंद विद्यालय आव्हाणा 100%,जि प प्रा.शाळा भोकरदन97.29% विवेकानंद विद्यालय क्षिरसगाव 98.27. या पध्दतीने भोकरदन तालुक्यातील शाळांचे निकाल लागले आहेत
Leave a comment