घनसावंगी । वार्ताहर
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार देशमुख यांना देण्यात आले यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,गोविंद ढेंबरे,सुरेश पोटे,योगेश ढोणे,रमेश काळे,नाना सोळंके,बाळासाहेब बहीर,रामेश्वर गरड,सिध्देश्वर भाणूसे,राहुल काळे,मारोती वाढेकर,नानासाहेब वैद्य,विलास चव्हाण, लहू मुळक,माऊली सानप, पवन पठाडे, लक्ष्मण मोटे व उपस्थित भाजप कार्यकर्ते. या निवेदनात शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नावर सनदशीर लोकशाही मार्गाने मा.जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन व सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करत राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर हे जिल्हाधिकार्यास निवेदन देण्यास गेले असता परभणी जिल्हा प्रशासनाने सूड बुद्धीने म्हणा किंवा प्रशासनाच्या हिताला बाधा पोहचत असल्याने गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हा तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच सोशल डिस्टंशिंगचे पालन करत घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेकायदेशीररित्या जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी पाणी पुरवठा मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.लोणीकर यांनी माजी आ.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव आदींसह जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन सादर केले होते. त्याद्वारे शेतकर्यांना बोगस बियाणे पुरवठा करणार्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करा, वारंवार संचारबंदी लागू करू नका, व्यवहार सुरळीत सुरू होवू द्या, अशी मागणी 14 जुलै रोजी केली होती. या अनुषंगाने छायाचित्रे प्रसिध्द झाल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी त्या गोष्टीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला.लोणीकर यांच्याविरुद्ध द्वेषाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार्या पोलीस निरीक्षकाने जर जिल्हाधिकार्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला असेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे तसेच पाथरी येथील शेतकरी विष्णू शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या पाथरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच सोशल डिस्टंशिंगचे पालन करत घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल तरी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची कार्यवाही करून आमचे नेते आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार्या पोलीस निरीक्षकाने जर जिल्हाधिकार्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला असेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे तसेच पाथरी येथील शेतकरी विष्णू शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या पाथरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
Leave a comment