आष्टी । वार्ताहर
कोरोना विषाणु (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तालुकयातील पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरीत होणार्या सर्व रास्तभाव दुकानातील शिधा वस्तुचे वाटप शासकिय कर्मचार्यांचे अधिपत्याखाली होणार असल्याची माहिती तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे दिली आहे.
तालुक्यातील एकुण 192 रास्तभाव दुकाने आहेत. यातील जवळपास सर्व दुकानात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेचे नियमित धान्य व याच योजनेतील अनुज्ञेय अन्नधान्या व्यतिरीक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफत धान्य वितरीत झाले असुन प्रत्यक्ष लाभधारकांना वितरण सुरु झाले आहे. तर एपीएल (शेतकरी) योजनेचे नियतन मंजुर झाले असुन या योजनेच्या धान्याची आवक सुरु होताच तात्काळ लाभधारकांना वितरण सुरु करण्यात येणार आहे. तालुक्यातील रास्तभाव दुकानदार यांचे मार्फत लाभधारकांना वितरण होणारे धान्य धान्य पात्र कार्डधारकांना नियमानुसार तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच वितरण होत आहे. किंवा नाही याची खातरजमा करणे . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करणे कार्ड धारकांना नियमानुसार पावती देणे व इतर सुचनांचे रास्तभाव दुकानदार काटेकोर पणे पालन करत आहे किंवा नाही यासाठी तालुक्यातील रास्तभाव दुकाननिहाय शासकिय अधिकारी/कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रास्तभाव दुकानदार यांनी कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरप्रकार होत असल्याचे आढळुन आल्यास संबंधित रास्तभाव दुकानदार यांचेवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आष्टीच्या प्रभारी तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी म्हटले आहे.
Leave a comment