परतूर । वार्ताहर
शहरात गेल्या आठवड्यात तब्बल 6 कोरोना रुग्ण सापडले असताना या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी परत रुग्ण आदळला असल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आतापर्यंत केवळ शहरातचं एकूण 11 रुग्ण संख्या झालेली आहे.तर तालुक्यातील रुग्णसंख्या 25 झालेली असून एकाचा मृत्यू झालेला आहे.
परंतुर शहरात सोमवारी दुपारी गावं भागातील लड्डा कॉलनीत एका 45 वर्षाच्या तरुणाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. सर्दी ताप आल्याने या तरुणाने जालना सामान्य रुग्णालयात तपासणी केली असता त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी दिली. परतूर शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे, गेल्या आठवड्यात तब्बल 6 रूग्ण शहरात आढळल्याने परतूरकर चिंतेत असताना सोमवारी परत 1 रुग्ण भर पडल्यावर नागरिकांतून काळजी घेण्याची जबाबदारी वाढली आहे. शहरात आतापर्यंत 11 रूग्ण आढळले असले तरी जनतेला याचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. रस्त्यावर मास्क न वापरता फिरणार्यांची संख्या मोठी आहे, तर सोशल डिस्टन्स बाबतीत ही कोणी फारसी काळजी घेताना दिसत नाही.त्यामुळे शहरात कोरोना झपाट्याने तर वाढणार नाही याची चिंता सुज्ञ नागरिकांना वाटते आहे.
Leave a comment