केज । वार्ताहर
गेली अनेक वर्षे केज येथील वीट भट्टीवर काम करणारे मजूर हे हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या मूळ गावी विदर्भात पायी जात असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच त्यांनी मजुरांची भेट घेतली आणि त्यांना पायी जाण्यापासून रोखले व वीटभट्टी मालकाची भेट घेऊन त्यांची राहण्याची आणि उपजीविकेची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
केज-बीड रोड लगतच्या विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात चाळक यांच्या वितभट्टीवर गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील वाशीम आणि त्या परिसरातील मजूर काम करीत आहेत. सध्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्यामुळे काम बंद आहे. त्यामुळे उपासमार होऊ नये. म्हणून येथे काम करणारे 40 ते 50 मजूर दि. 12 एप्रिल रोजी दुपारी केज येथून पायी प्रवास करीत असताना पत्रकार श्रावण जाधव व दीपक नाईकवाडे यांच्या हे मजूर रेणुका पेट्रोल पंपाजवळ दृष्टीस पडताच त्यांनी तहसीलदार दुलाजी मेंढके त्यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार मेंढके यांनी तात्काळ त्या मजुरांशी आणि वीटभट्टी मालकाशी संपर्क साधून भेट घेतली. त्यांच्या उपजिविके बाबत आदेश दिले व जिल्हा बंदी असल्यामुळे पायी प्रवास करण्यास बंदी असल्याचे संगितले. तसेच पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, पत्रकार श्रावण जाधव, दीपक नाईकवाडे, गौतम बचुटे दत्तात्रय हंडीबाग यांनी मजूर व मालक त्यांच्याशी चर्चा करून त्यांची व्यवस्था करण्याच्या शासनाच्या सूचना असल्याचे संगितले.यामुळे तहसीलदार पत्रकार व पोलीस अधिकार्यामुळे वीटभट्टी मजुरांचे पायी होणारे स्थलांतर रोखले गेले.
Leave a comment