वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे केली मागणी
बदनापूर । वार्ताहर
तहसील कार्यालयात बर्याच कर्मचार्यांच्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बदल्या झालेल्या नसुन ते बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी , निराधार, विद्यार्थी यांना कामासाठी तहसिल कार्यालयात येत असल्याने सदर बदल्या व प्रतिनियुक्ती झालेल्या असलेल्या कर्मचार्यांच्या बदनापूर तालुक्यातील अवैध वाळू माफियाशी संबंध असल्याने तहसीलदार यांच्या तालुका दौर्याची माहिती वाळु माफियांना देणे व माफियाकडुन अथिंक देवाण घेवाण करण्यात येत व सामान्य शेतकर्यांची अडवणूक करून आर्थिक लुबाडणूक सदर हे बदल्या न झालेल्या प्रतिनियुक्ती असलेल्या कमंचारी करत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर तहसिल कार्यालयात विशेष म्हणजे प्रतिनियुक्ती असलेल्या पेशकार, शिपाई, तहसीलदार यांचे वाहन चालक हे सदर विविध कामात ढवळाढवळ करून सामान्य शेतकर्यांची विद्यार्थ्यांची निराधाराची अडणुक करून सामान्य नागरिकांना अरीवैरीची भाषा वापरतात तरी जिल्हाधिकारी साहेबांनी या बाबीकडे विशेष लक्ष देवून सदर बदनापूर तहसिल कार्यालयातील कालावधी संपलेल्या व प्रतिनियुक्ती असलेल्या अधिकारी कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात याव्या नसता वंचित बहुजन आघाडीची च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे या निवेदनावर पक़ाश मगरे वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव , संतोष शेळके तालुका अध्यक्ष बदनापूर, प्रकाश खरात, सुरेंद्र तुपे जेष्ठ नेते रविराज वाहुळे, हरिश बोंडे, आदींच्या स्वाक्षर्या आहेत
Leave a comment