कडा । रघुनाथ कर्डीले
तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणुचा संसर्गजन्य रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुर्ण गावात अनिश्चित काळापर्यंन्त संचारबंदी लागु केली. अचानक सर्व यंत्रना ठप्प झाली. या गावात प्रमुख जगण्याचा व्यवसाय म्हणजे दुध धंदा होय. सर्वसाधारण सेवेबरोबर अत्यावश्यक सेवा ही लाँकडाऊन करण्यात आल्या.यामध्ये दुध संकलनाचाही समावेश करण्यात आला.गेल्या पाच दिवसापासून गावातील दुध संकलन बंद असल्याने दुध घरीच राहत आहे.यामुळे लाख मोलाच दुध फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर येत आहे.
पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यावसाय चालु केला. दुधाला भावही वाढले. या व्यावसायात परवडत असल्याने एकाच पाहुन दुसर्याने पण दूध व्यवसाय चालु केला. दोन तीन वर्षात दिड हजार लिटरवरुन चार हजार लिटर दूध पिंपळा गावात उत्पादित होऊ लागलं. असं असताना गावात कोरोना आला आणि सर्व काही विस्कळीत झाल. दुध किटल्या रस्त्यावर ओतुन देताना पाहुन हा व्यावसायच नासका आहे की काय अस चित्र शेतकरी आणि दुध उत्पादक यांच्या बोलण्यात दिसत होती. मानसाबरोबर दुधही स्वताहुन काँरटाईन झाल्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. लगेच जनावरे विकावेत की काय असा सुर शेतकरी वर्गातुन येतोय. किमान आमच दुध तरी शासनाने चालु करावे, अशी मागणी दुध उत्पादक करत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट निगटिव्ह आल्याने अत्यावश्यक सेवा तरी प्रशासनाने पुर्ववत कराव्यात आणि आमचे दुध संकलन चालु करावेत. अशी आशा शेतकरी वर्ग करत आहे. याबाबत शेतकरी दत्तोबा भस्मे म्हणाले,माझ्या गावात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे चार दिवसापासुन गाव बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दुध संकलन केंद्रही बंद करण्यात आले आहेत. माझ्याकडे 180 लिटर दुध आहे. रोज पाच हजार रुपयाचे दुध फ़ेकुन द्यावे लागत आहे. खर्च पण चुकत नाही. या कोरोनामुळे ़फुकटही कोनी दुध घेत नाही. कष्टही चुकत नाही. काय कराव काहीच सुचत नाही.किमान शासनाने दुध तरी घ्यावे.
तर दुध संकलन केंद्र प्रमुख गणेश गाढवे म्हणाले, गावात दररोज चार हजार लिटरच्या जवळपास दुध उत्पादन होत आहे. सर्व दुध संकलन केंद्र बंद असल्या कारणाने रोज दुध उत्पादकांचे एक लाखाच्या पुढे नुकसान होत आहे. काही उत्पादक विकत चारा घेऊन जनावरे संभाळत आहे. या कोरोनामुळे सर्वसामान्य दुध उत्पादकांचे नुकसान म्हनजे दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखे झाल आहे. शेतकर्यांच नुकसान होऊ देऊ नका लोक कोरोनातुन मुक्त होतील आणि खुप मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतील. याबद्दल लवकर निर्णय घ्यावा.
---
Leave a comment