भोकरदन । वार्ताहर

वारकरी मंडळाचे संत सुरक्षा संघटन मंत्री हभप ज्ञानेश्‍वर माऊली महाराज शेलुदकर व वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष हभप विष्णु महाराज सास्ते यांच्या वतीने काल दि 23 रोजी तहसीलदार  यांच्या कडे वारकर्‍यांच्या  विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले  या निवेदनात प्रथम पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज यांच्या वंशजा- वर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येऊन श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी  पासून भजन कीर्तन कमीत कमी 50 भाविकांना सोशल डिस्टंसिंग ठेवून परवानगी देण्यात यावी तसेच झी मराठी या वाहिनीवर ङ्गुबाईङ्गु या कार्यक्रमा मध्ये लीना भागवत ,ऋषिकेश जोशी, निलेश साबळे यांनी कीर्तन परंपरेचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे आणि समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर केलेल्या खोट्या तक्रारींचा गुन्हा मागे घेऊन संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी या मागण्यांसाठी भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. 

दरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या क्षेत्रांमध्ये अलौकिक कार्य करत आले असून स्वच्छता मोहीम, वृक्षरोपण, व्यसनमुक्ती, हुंडा बंदी, पाणी आडवा पाणी जिरवा, पर्यावरण रक्षण ,स्त्री भ्रूण हत्या, सामाजिक बांधिलकी या संबंधाने प्रभावी जनजागृती करत आले असून काही दृष्ट प्रवृत्ती व हिंदूधर्म द्वेषी वारकरी मंडळांच्या महाराजांना विनाकारण त्रास देऊन बदनाम करण्याचा विडा उचलला असून आरोप करत खोटे गुन्हे दाखल केले असून वारकरी मंडळाच्या भावनेस  मोठी ठेच पोहोचली आहे. शिवाय महामार्ग च्या काळात सृजनशील व शांतताप्रिय कार्य करणार्‍या सांप्रदायिक वारकरी मंडळाचा भजन कीर्तन कार्यक्रम तसेच समाजप्रबोधनाचे कार्य पूर्णपणे बंद असून पंढरीची वारी सुद्धा शासनाने बंद केली आहे. असे असताना शासनाने वारकरी सांप्रदायीक यांचा अंत पाहू नये असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनात दिलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 30 जुलै रोजी पंढरपूर येथे नामदेव महाराज पायरीजवळ अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संत सुरक्षा संघटनमंत्री ह भ प ज्ञानेश्‍वर माऊली महाराज शेलुदकर वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णु महाराज सास्ते यांच्यासह महंत दौलत बाबा,  अंबादास महाराज पारध कर ,श्री गव्हाड सर, श्री विठ्ठल महाराज गोळेगावकर यांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.