बदनापूर । वार्ताहर
तालुक्यातील देवपिंपळगाव येथील एका तरुणांच्या घरात बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारू साठवून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून दारू जप्त करण्यात आली. तालुक्यातील देवपिंपळगाव येथील मंगेश दत्ता जाधव या तरुणाने आपल्या राहत्या घरात देशी दारूचा अवैध साठा करून त्याची चोरटी विक्री करत असल्याचे बदनापूर पोलिसांना माहिती मिळाल्यावरून बदनापूर पोलिसांनी देवपिंपळगाव येथे त्याच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरातून खाकी रंगाच्या खोक्यात 48 देशी दारूच्या बाटल्या व एका गोणीत 12 देशी दारूच्या असा 60 बॉटल दारू साठवूण ठेवलेली दिसून आली.
सदरील देशी दारूचा साठा आरोपी मंगेश जाधव याने बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांच्या वतीने पोलीस कर्मचारी मनोज निकम यांनी ङ्गिर्यादी होऊन तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह उपनिरीक्षक शेळके तपास करत असल्याची माहिती ठाणे अंमलदार खंडागळे यांनी दिली
Leave a comment