मंठा । वार्ताहर
स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा राष्ट्रीय सेवा योजना तर्ङ्गे आयोजित अण्णाभाऊ साठे ङ्गेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव कमळकर यांनी गुंङ्गले. ’अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक आशय पर वगनाट्य’ विषयावर डॉ. कमळकर यांनी आपले विचार मांडले. अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याची महती त्यांनी अधोरेखित केली . माझी मैना गावाकडे राहिली ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लावणीचा त्यांनी उल्लेख केला. याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्र होण्याअगोदर महाराष्ट्र विखुरलेला होता. ज्यांना संयुक्त महाराष्ट्र मध्ये या लढ्यामध्ये सामील व्हायचे होते त्याची हळहळ या लावणीमध्ये अण्णाभाऊंनी व्यक्त केली असे डॉक्टर कमळकर म्हणाले. अण्णा भाऊंनी परंपरागत लावणीतील वंदन आणि स्तवनातील अधिष्ठाने बदलून त्या जागी मायभूमी, हुतात्मे , स्वातंत्र्यवीर असे अधिष्ठान ठेवली.
पेंद्याच लग्न या नाटकाची सुरुवात प्रथम मायभूमीच्या चरणा छत्रपती शिव चरणा स्मरूण गातोकवणा अशी सुरुवात अण्णाभाऊंनी केल्याचे डॉक्टर कमळकर म्हणाले. अण्णाभाऊंनी तमाशातील अश्लील विनोद असलेला गवळणी चा भाग काढण्याचे कार्य केले तथा तमाशातील परंपरागत प्रधान, सेनापती, राजाराणी ही काल्पनिक पात्रे बदलून त्याजागी गावकरी, शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, पाटील, पुढारी ही वास्तववादी पात्रे आणल्याचे त्यांनी अधोरेखित केले . अण्णाभाऊंनी तमाशा मध्ये शोषक आणि शोषित यामधील संघर्ष, काळाबाजार, अन्नटंचाई, दैन्य , दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, मतदान निवडणूक या विषयांचा समर्थपणे समावेश केल्याचा आढळते असे मत डॉ. कमळकर यांनी व्यक्त केले. अण्णाभाऊंची वगनाट्य सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी होती अण्णा भाऊंना क्रांतिकारकाईतकीच समाजसुधारणेची दृष्टी लाभली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारा पोवाडा अण्णा भाऊंनी सातासमुद्रापार असलेल्या रशिया येथे सादर केला असल्यामुळे ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शाहीर होते असे डॉक्टर कमळकर पुढे म्हणाले. अण्णा भाऊंनी लिहिलेल्या कथा कादंबर्यांचा नायक हा खेड्यातील वंचित घटक दाखवलेला आपल्याला पाहायला मिळते. पेद्याचं लग्न, अकलेची गोष्ट, बेकायदेशीर मंत्री, दुष्काळात तेरावा, पुढारी मिळाला, माझि मुंबई, बिलंदर बुडवे ही लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलेली त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरली व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या वगनाटयांनी आपली भूमिका ठासून समाजासमोर मांडली असल्याचे डॉ. कमळकर म्हणाले. या वगनाट्य वर अनेकांनी एमङ्गिल पीएचडी केल्याचा उल्लेख डॉ. कमळकर यांनी केला. अण्णाभाऊंनी त्यांच्या वांग्मय यातून गरीब शेतकरी मजूर कष्टकरी याचा अंतरंग समर्थपणे मांडले . अण्णाभाऊंच्या वांग्मयाचा व साहित्याचा जागर होणे ही आजच्या काळाची गरज आहे असे डॉ. कमळकर आपल्या व्याख्यानाच्या शेवटी म्हणाले. या व्याख्यानमालेचे तिसर्या पुष्पा चे आभार प्रदर्शन डॉक्टर तुषार धोंडगे यांनी केले.
Leave a comment