बदनापूर । वार्ताहर
जालना औरंगाबाद महामार्ग ते कडेगाव गावापर्यत रस्त्यावरून दुचाकी चालवणे कठीण झाले असून पायी चालण्यास सुध्दा मोठी कसरत करावी लागत आहे . या रोडचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन झाले होते. त्यानंतर चार पाच वर्षापुर्वी थोडीङ्गार प्रमाणात डागडूजी करण्यात आली. तेव्हापासून या रस्त्याकडे कोणी डूंकवूनही पाहीले नसल्याचे गावातील नागरीकांचे म्हणणे आहे.
जर बदनापूर तालुक्यातील रोडलगत असणार्या गावाचे असे हाल असतील तर बाकी गावाला जाणार्या रस्त्याचे न सांगणेच बरे हा रस्ता या अगोदर कादोपत्री झाला असल्याचे काही गावकर्यांचे म्हनने आहे तर या रस्त्या बाबद चोकशी केली तर गैर प्रकार झाला असेल असेहि काही गावकर्यांचे म्हणणे आहे असे गावातून सांगण्यात आले पण प्रतेक्षात खरे पितळ या रस्त्याची चोकशी झाल्यावर कळेल .मग रस्ता खरच झाले का ? कागदोपत्री दाखवून आधा तुम्हारा आधा हमारा या म्हणी प्रमाणे तर केले नाही ना असे करुन संबंधित अधिकार्यांनी व गुत्तेदारानी उचलून खाल्ले याची सखोल चौकशी केल्यास मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड होईल .रस्त्यातून जाणे एवढे कठीण झाले आहे की रस्त्यात खड्डे की खड्डात्यात रास्ता आहे हे समजेना झाले या रस्त्यातून कोणतेही वाहन चालवणे खुपचं अवघड झाले त्यामुळे लवकरात लवकर रस्ता होणे खूप गरजेचे आहे डाँ. प्रदीप खोतकर, कडेगाव.
Leave a comment