मंठा । वार्ताहर
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची मंठा तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात तालुका अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची तर उपाध्यक्षपदी रितेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्यांना जिल्हाध्यक्ष कृष्णा गाढेकर यांच्या शिङ्गारशीनुसार नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय युवा परिषद राष्ट्रीय स्तरावर अराजकीय क्षेत्रात काम करणारी संघटना ही संपूर्ण तालुक्यात राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करून राष्ट्रीय युवा परिषदेतर्ङ्गे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
राज्य अध्यक्ष डॉ.त्रैवेणीकुमार कोरे, राज्य सचिव कमलेश सोनवणे, राज्य सदस्य राहुल वाकणकर यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांची कौतुक केले आहे. तालुका कार्यकारिणीत यांचा समावेश तालुकाध्यक्ष तुषार भुसारे, उपाध्यक्ष रितेश चव्हाण, मुख्य सचिव राहुल गोंडगे, कोषाध्यक्ष मारोती लोमटे, सचिव सचिन राठोड, वैभव थोरात, ज्ञानेश्वर जाधव, नंदकिशोर ठोकरे, समन्वयक उमेश राठोड, आत्माराम गुंड, अर्जुन रिठाड, सुरज पवार, दिपक राठोड यांचा समावेश आहे.
Leave a comment