मंठा । वार्ताहर
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाची स्वतःची एकच बोलीभाषा आहे. या समाजाची संस्कृती, पोशाख, लोककला, लोकगीते आणि वाङमयीन संपदा टिकून ठेवण्यासाठी शासनाने मुंबई सारख्या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बंजारा ङ्गेस्टिवल आयोजित करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, गोवा या सारख्या राज्यात बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.भारतातील अनेक राज्यात विखुरलेल्या या समाजाची बोलीभाषा आणि संस्कृती एकच असून तिचे जतन होणे गरजेचे आहे. बंजारा भाषा, संस्कृती आणि बंजारा पेहराव या प्राचीन परंपरेसह बंजारा समाजातील संत-महंत आणि विचारवंत यांचे साहित्य पुस्तक रूपाने प्रसिद्ध व्हावे. पुस्तकांच्या निर्मितीसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे.बंजारा भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, बंजारा लोककला जगभरात लोकप्रिय आहे, अशा कलेला राजाश्रय मिळावा आणि बंजारा पेहराव आणि हस्तकला निर्मिती केंद्र सुरू व्हावेत. तसेच दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या परेडमध्ये बंजारा संस्कृतीची ओळख व्हावी, यादृष्टीने बंजारा संस्कृतीला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी आ.राठोड यांनी केली आहे.
Leave a comment