शिवस्वराज्य ग्रुपच्या तरुणांकडून इतरांनी आदर्श घ्यावा
8 दिवसापासून गेवराईतील 300 भुकेल्यांना अन्नदान
===================
गेवराई ( ) देश आणि राज्यावर आलेल्या संकटात प्रत्येक वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम गेवराईतील तरुण मंडळी करत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने, शेकडो लोक गेवराई शहरात अडकलेले आहेत. अशा 300 भुकेलेल्यांना स्वखर्चाने शिवस्वराज्य ग्रुप च्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून अन्नदान केले जात आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे इतरांनीही अनुकरण करायला हवे.
कोरोनामुळे तालुका लॉक डाऊन करण्यात आला असून, संचारबंदीही कडक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बेघर, गरीब आणि इतर जिल्ह्यातील अडकलेले ट्रक ड्रायव्हर, मजूर आशा 250 ते 300 लोकांना दररोज प्रत्यक्ष जाऊन शिवस्वराज्य ग्रुप चे पदाधिकारी जेवणाचे डबे पोहोच करत आहेत. अन्नदानाचे काम गेल्या 6 दिवसापासून हे तरुण मोठ्या जोमाने करत आहेत. त्यांची धडपड तळमळ आणि निस्वार्थीपणाचे काम पाहता, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सचिन नाटकर, अशोक जवंजाळ, अमित कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, प्रशांत घोटनकर, महेश नीलकंठ, योगेश कापसे, सुरेश कापसे, निलेश ढाकणे, सुदर्शन गुळजकर, प्रसाद जोशी, अभय पाटील,
अविनाश कुलकर्णी, सोनू ब्रह्मनाथे, बळीराम सोनवणे, ईश्वर घोलप हे एकत्र बसले असता अचानक लॉक डाऊन झाल्याने, त्यांच्या मनात विचार आला, आपल्याकडे अडकलेले ट्रक ड्रायव्हर, मजूर आणि इतर बरेच लोक सध्या काय खात असतील ? कारण आता सर्व धाबे आणि हॉटेल्स पूर्णपणे बंद आहेत. हे लोक आपल्या गावाकडे ही परत जाऊ शकत नाहीत, मग हे लोक काय खातील ? कसे राहत असतील ? याविचारातून त्यांनी स्वखर्चाने आणि आपापल्या घरातून जमेल कसे धान्य, भाजीपाला हे अन्नदानसाठी लागणारी प्रत्येक वस्तू आणायची आणि स्वयंपाक करून सर्वांना जेवण द्यायचे. गेल्या 6 दिवसापासून हे शिवस्वराज्य ग्रुप चे सोडून एकत्र येऊन स्वतः स्वयंपाक करून भुकेल्यांना जेवण पोहोच करत आहेत. त्यांच्या या कार्याचा इतर तरुणांनाही आदर्श घ्यावा आणि या आपत्तीच्या काळात गोरगरीबांच्या पोटात दोन घास अन्न अवश्य घालावे.
12
Apr
Leave a comment