बदनापूर । वार्ताहर
जालना जिल्हयातील कोरोनाची स्थितीत दिवसेंदिवस बिकट होत असताना बदनापुरातही संसर्ग वाढू नये म्हणून पोलिस प्रशासनाने कडक भूमिका अवलंबलेली असून दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे दोन व्यावसायिक प्रतिष्ठानाविरोधात थेट गुन्हे नोंदवल्यानंतर शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसारच वाहनातून वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले असून जर नियमभंग केला तर थेट वाहन जप्त करण्यात येईल असा इशाराच पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. बदनापूर तालुका संभाजीनगर-जालन जिल्हयाच्या सिमेवर असून संभाजीनगर व जालना येथे कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात आढळून येत असताना बदनापूर तालुक्यातील आरेाग्य प्रशासन, पोलिस प्रशासनाने केलेल्या कडक उपाययोजनामुळे तालुक्यात आतापर्यंत 11 कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील कोरोना आकडा वाढू नये म्हणून प्रशासन कडक भूमिका घेत आहे. दरम्यान व्यवसाय करताना सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणार्या दुकानांवर बदनापूर पोलिसांनी थेट कारवाई करून दुकानमालकांवर गुन्हे नोंद केलेले होते. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव तालुक्यात होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन कडक धोरण अवलंबत असून त्या अनुषंगाने रस्त्याने वाहतूक करणार्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना रोगाचा प्रार्दूभाव होऊ नये म्हणून वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने दूचाकीवर एक प्रवासी तर तीन चाकी व चारचाकी वाहनात तीन प्रवासी (चालकसह) परवानगी देण्यात आलेली असताना मुख्य रस्त्यावर तसेच बाहेरगावाहून बदनापूर परिसरात येणार्या वाहनांमध्ये सर्रास या बाबीचे उल्लंघन होत असल्यामुळे आपत्ती निवारण कायद्याचा भंग होतो त्या अनुषंगाने बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी वाहनधारकांना नियमानुसार वाहतूक करण्याचे निर्देश दिले असून जर नियमभंग केला तर थेट वाहनजप्तीची कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे.
Leave a comment