तिर्थपुरी । सर्जेराव गिरे
घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण शिवारातील सागर सहकारी साखर कारखाना जवळील शेत वस्तीवर चार ते पाच दरोडेखोरांनी शिवाजी गरड यांच्या घरावर शस्त्राचा धाक दाखवून महिलाच्या अंगावरील सोने-चांदी व नगदी रुपये असा मिळून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार 15 जुलै रोजी रात्री दीड वाजता गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सविस्तर माहिती अशी की शिवाजी गरड व मुलगा पत्नी कुटुंब तीर्थपुरी ते घनसावंगी रस्त्यावरील सागर सहकारी साखर कारखाना हाकेच्या अंतरावर हे कुटुंब शेत वस्तीवर अनेक वर्षापासून राहात असून काल बुधवार रोजी जेवण करून सर्व कुटुंब व मुलगा हा कारखान्यावर ड्युटीला गेला होता हे कुटुंब गार झोपेत असताना चार ते पाच दरोडेखोर हातात तलवार धारदार शस्त्र व काही जणांच्या हातात लाकडी दंडुके घेऊन गरड यांच्या घरावर चाल करून गेले व घरात प्रवेश करून जीवे मारण्याची धमकी देऊन हातात तलवार धारदार शास्त्राच्या धाक दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्याची पोत कानातील झुंबर गळ्यातील मणी मंगळसूत्र पायातील चांदीचे चैन साखळी पायातील जोडे तसेच लहान मुलाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या असा मिळून अडीच तीन तोळे सोने व सहा तोळे चांदी दागिन्यांसह व नगदी तीन हजार रुपये असा मिळून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला तसेच काही महिला अंगावरील सोने देताना चोरट्यांनी हिसकावून घेतले तर लहान मुलाच्या कानातील बाळ्या दरोडेखोरांनी स्वतः बाळ्या शास्त्राने कापून हिसकावून घेतल्या या घटनेमुळे परिसरात शेत व वस्त्यावर राहणार्या लोकात एकच घबराट पसरली असून या दरोडा प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी चंपालाल शिवगण तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड तसेच तीर्थपुरी पोलिस चौकीचे गजानन कोळा से तसेच स्वान पथकाच टीम घटनास्थळी दरोडेखोरांचा माग मुद्दा काढण्यासाठी आले होते पण म्हणावा तसा हाती काहीच श्वानपथकाला मिळाला नाही तसेच दरोडेखोरांनी ऐवज नेताना गरड कुटुंबांना एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन शिवाजी गरड यांच्या घराची पहाणी केली.
Leave a comment