उच्च न्यायालयाचे आदेश कायम आ. गोरंटयाल यांना एक लक्ष रुपये खर्च देण्याचा आदेश
जालना । वार्ताहर
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, अशी बोलकी प्रतिक्रिया जालन्याचे काँग्रेस आ.कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या जालना विधानसभा निवडणुकीत निर्धारित वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल न केल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,अशी मागणी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी जालना विधानसभा मतदार संघाच्या तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका लेखी अर्जाद्वारे केली होती. ही मागणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मजूंषा मुथा यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे गोरंटयाल यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात या प्रकरणी आव्हान दिले होते.
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन दोन वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2017 मध्ये न्यायालयाने गोरंटयाल यांच्या बाजूने निर्णय देत तत्कालीन आ.अर्जुनराव खोतकर यांना अपात्र ठरवून या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसाची मुद्दत देण्यात आली होती. दिलेल्या मुद्दतीत खोतकर यांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केल्यानंतर या अपिलावर सुप्रीम कोर्टात गेल्या काही वर्षांपासून सुनावण्या घेण्यात आल्या. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आज दि.14 जुलै 2020 मंगळवार रोजी सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत अर्जदार कैलास गोरंटयाल व विजय चौधरी यांना प्रत्येकी एक लाख रुपये खर्च देण्याचे आदेशीत केले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की,सत्य परेशान होता हें, पराजित नही, अशी बोलकी प्रतिक्रिया देताना या निर्णयाबाबत तज्ञ वकिलांशी विचार विनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आ.गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Leave a comment